Popular Posts

Monday, April 20, 2020

प्रार्थना


            तू  बुद्धी  दे  तू  तेज  दे

तू  बुद्धी  दे  तू  तेज  दे  नवचेतना विश्वास  दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे||

हरवले  आभाळ  ज्यांचे  हो  तयांचा सोबती
सापडेना  वाट  ज्यांना  हो  तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे||

जाणवाया दुर्बलांच्या दुःख आणि  वेदना
तेवत्या राहो  सदा रंध्रातूनी संवेदना
धमन्यातल्या रूधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दास अन् अर्थ या जगण्यास दे||

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा  सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी  संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश  दे
जे  सत्य  सुंदर  सर्वथा  आजन्म  त्याचा  ध्यास  दे||

तू  बुद्धी  दे  तू  तेज  दे  नवचेतना  विश्वास  दे||






गगन सदन  तेजोमय


गगन सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण 
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय




असो तुला देवा माझा

असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार 
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
 तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची 
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
 असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची 
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची 
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार 
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल तरि प्रभो !
 शतजन्मांची मतृषा शमेल तुझे म्हणुनि आलो राया ! 
बघत बघत दार असो तुला देवा !
 माझा सदा नमस्कार ॥३॥

- साने गुरुजी (धुळे तुरुंग) 

. देह मंदिर चित्त मंदिर
देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना  ॥धृ॥

दु:खितांचे दु:ख जावो हि मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना   ॥१॥

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना   ॥२॥

भेद सारे मावळू द्या वैर सा-या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना   ॥३॥


 संपू दे अंधार सारा
संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे, वाहू दे आनंद वारे ॥धृ॥

जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा॥१॥

स्वच्छ सारे मार्ग व्हावे, अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे, जीवसृष्टी जन्म घ्यावी ॥२॥

स्पंदनांचा अर्थ येथे, एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा  ॥३॥

हीच अमुची प्रार्थना  अन् हेच अमुचे मागणे
हीच अमुची प्रार्थना  अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे  ॥धृ॥

भोवताली दाटला अंधार दु:खाचा जरी,
सूर्य सत्याचा उगवेल आहे खात्री,
तोरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे   ॥१॥

धर्म, जाती, प्रांत, भाषा द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे   ॥२॥

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले,
पाऊले चालो पुढे ... जे थांबले ते संपले
घेतला जो स्वास आता तो पुन्हा न लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे   ॥३॥

 असो तुला देवा माझा सदा नमस्कार

असो तुला देवा माझा सदा नमस्कार
तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार ॥१॥

तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधु पार ॥२॥

तुझ्या कृपासिंधुमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो शतजन्माची मम तृषा शमेल
तुझा म्हणुनी आलो देवा बघत बघत दार ॥३॥

 खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥धृ॥

जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥

सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥

प्रभुची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥

असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥



 ओम तत् सत् श्री नारायण तू

ओम तत् सत् श्री नारायण तू
पुरुषोत्तम गुरु तू  ।
सिद्ध बुद्ध तू स्कंद विनायक
सविता पावक तू   ॥
ब्रह्म मज्द तू यह शक्ती तू
ईशू पिता प्रभू तू  ।
रुद्र विष्णु तू राम-कृष्ण तू
रहीम ताओ तू   ॥
वासुदेव गो-विश्वरूप तू
चिदानंद हरी तू    ।
अद्वितीय तू अकाल निर्भय
आत्मलिंग शिव तू   ॥
सागर वसना पावन देवी

सागर वसना पावन देवी
सरस सुहावन भारत माँ॥धृ॥

हिमगीर निल पयोधर वत्सल
जनमन भावन भारत माँ
सागर वसना पावन देवी
सरस सुहावन भारत माँ॥१॥

देवी रज को संचित करने
गोरस सरिता बहती थी
गंगा, यमुना, सिंधू, सराविल
ललित कथाए कहती थी
आज बहानी खंडित होकर
करुणा सावन भारत माँ॥२॥
 नमो भास्करा
नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
तनाचा मनाचा कराया विकास
गतीच्या विकासास द्यावा प्रकाश
झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश
नमो शारदा मी तुझा नम्र दास
अशी बुद्धी देई मला तुची खास
घडो मायभूची अहर्निश सेवा
मनाला अहंकार कधी न शिवावा

 तुम्ही हो माता
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो   ॥धृ॥

तुम्ही हो विद्या, तुम्ही हो दौलत ।
तुम्ही हो अल, तुम्ही हो हव्वा।
तुम्ही हो अहुरा, जगत की मैया ॥१॥

तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे।
कोई न अपना सिवा तुम्हारे।
तुम्ही हो नैय्या, तुम्ही खिवय्या  ॥२॥

जो खिल सकेना वह फुल हम है ।
तुम्हारे चरणो की धूल हम है   ।
दया की दृष्टी सदाही रखना  ॥३॥
 अजाण आम्ही तुझी लेकरे

अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा ॥धृ॥

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे
तुझीच शेते सागर डोंगर फुले, फळे पाखरे ॥१॥

अनेक नावे तुला तुझे रे, दही दिशांना घरे
करिशी देवा सारखीच तू, माया सगळ्यांवर ॥२॥

खूप शिकावे काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा, हीच एक मागणी ॥३॥

 गुरुदेव दया करके
गुरुदेव दया करके, मुझको अपना लेना
मैं शरण पड़ा तेरी – चरणो में जगह देना ॥धृ॥

तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो।
इस दिल में समाये हो, मुझे प्राणो से प्यारे हो॥
नित नाम जपू तेरे, नही दिल से भुला देना ॥१॥

करुणानिधी नाम तेरा, करुणा कर दिखलाना ।
सोये हुये भाग्योंको, हे नाथ जगा देना ॥
मेरी नाव भंवर डोले, उसे पार लगा देना ॥२॥

पापी हू या कपटी हूँ जैसा हूँ तुम्हारा हूँ।
नही नाथ भुलाना मुझे, इस जग में अकेला हूँ॥
तेरे दर का भिखारी हूँ, मेरे दोष भुला देना ॥३॥

दर्शन का प्यासा हूँ, इस जग में अकेला हूँ।
अपनालो मुझे स्वामी दरदर ठुकराया हूँ॥
इतना तो करो बाबा अब शरण में आया हूँ॥४॥
 प्रार्थना देवा तुला रे
प्रार्थना देवा तुला रे, मिटू दे वैर सा-या वासना ।
सत्यं शिवम सुंदराची नित्य हो आराधना ।
सज्जनांचे वेध लागो या मानवी जीवना  ।
पिडितांचे दु:ख जावो आमुची ही प्रार्थना  ।
भिती आमुची नष्ट होवो विपत्ती बोहारी मना ।
सुखी असो सर्व जगी मनाची ही कामना ।
प्रार्थना देवा तुला रे, मिटू दे वैर सा-या वासना ।
. या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार  ॥धृ॥

आईस देव माना वंदा गुरुजनांना
जगी भावनेहुनी त्या कर्त्यव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार ॥१॥

शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे
जे चांगले जगी या त्याचा करा स्विकार ॥२॥

शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदु मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील थोर माना ठेवू नका विकार ॥३॥
 इतनी शक्ती हमें देना दाता

इतनी शक्ति हमें देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे, हमसे भूलकर भी कोई भूल हो ना॥धृ॥

दूर अज्ञान के हो अँधेरे, तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम, जीतनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन में बदले की हो ना॥१॥

हम न सोचें हमें क्या मिला है, हम ये सोचें क्या किया है अर्पण
फूल खुशियों के बांटें सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन
ओ.. अपनी करुणा को जल तू बहा के, करदे पावन हर एक मन का कोना॥२॥

हम को मन की शक्ति देना

हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरोंकी जय से पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना  ...॥धृ॥

भेद-भाव अपने दिलसे, साफ़ कर सकें
दूसरोंसे भूल हो तो, माफ़ कर सकें
झूठ से बचे रहें, सचका दम भरें
दूसरोंकी जयसे पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना  ...॥१॥

मुश्किलें पड़ें तो हमपे, इतना कर्म कर
साथ दें तो धर्म का, चलें तो धर्म पर
खुदपे हौसला रहे, सचका दम भरें
दूसरोंकी जयसे पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना  ...॥२॥

 तन मनाच्या मंदिरी या जागवूया चेतना

तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला २ हीच अमुची प्रार्थना॥धृ॥

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना॥१॥

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना॥२॥

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना॥३॥

सत्यम शिवम सुंदरा

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा॥धृ॥
शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा, चिमणपाखरा॥१॥
विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा॥२॥
होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा॥३॥





 दया कर दान विद्या का

दया कर दान विद्या का हमे परमात्मा देना,
दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना।

हमारे ध्यान में आओ, प्रभु आँखों में बस जाओ,
अँधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना।

बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर,
हमे आपस में मिलजुल के प्रभु रहना सीखा देना।

हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा,
सदा ईमान हो सेवा, वो सेवक चर बना देना।

वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना,
वतन पे जा फ़िदा करना, प्रभु हमको सीखा देना।

दया कर दान विद्या का हमे परमात्मा देना,
दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना।

 खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

. शुभंकरोती म्हणा मुलांनो

दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
शुभंकरोती कल्याणम्‌, शुभंकरोती कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशांदिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा

या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना

दिव्या-दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना

तू बुद्धी दे
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना 
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
मना घडवी संस्कार
तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार

मना उद्धरी संस्कार मना भूषवी संस्कार
मना तेजवी संस्कार मना आकारी संस्कार
मना आधार संस्कार मना घडावी संस्कार

मना नीती दे संस्कार मना शांती दे संस्कार
मना बुद्धी दे संस्कार मना सिद्धी दे संस्कार
मना शक्ती दे संस्कार मना घडावी संस्कार

मनाचे ऐश्वर्या संस्कार मनाचे सौन्दर्य संस्कार
मना आदर्श संस्कार मना सदभाव संस्कार
मना विवेक संस्कार मना घडवी संस्कार
 एक प्रतिज्ञा असे आमुची
एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना,
चिरंतन ज्ञानाची साधना |
ज्ञान हेच संजीवन सा-या जगताच्या जीवना ||धृ ||
ज्योत जागवू सुजाणतेची सकलांच्या अंतरी |
तीच निवारील पटल तमाचे प्रभात सूर्यापरी |
ज्ञानच देऊळ, ज्ञानच दैवत प्रगतीच्या पूजना || ||
नव्या युगाचा नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे |
त्यातच आमुच्या उजळ आश्वासन राहे |
मुक्त करील तो परंपरेच्या बंदिघरातुन मना || ||
हाच मंत्र नेईल आम्हाला दिव्य भविष्याकडे |
न्यायनितीचे पाऊल जेथे भेदाशी ना अडे |
जे जे मंगल पावन त्याची जेथे आराधना || ||

 गुरु ईश्वर तात माय
गुरू ईश्वर तात माय,
गुरुविण जगी थोर काय ॥ गुरुवेनम:
गुरू प्रेमळ गुरू उद्धार,
जडतेचा हरुनी भार
न्यावयास पैलपार,
एकमेव गुरू उपाय ॥ गुरुवेनम:
प्राणासह भरुनी श्वास
ज्ञानाचा दे प्रकाश
कराव्या मातीचा विकास,
कोण दुजा गुरू शिवाय ॥ गुरुवेनम:
गुरू तारा रम्य राशी,
तोच अग्नी जलराशी
ओलांडून विश्व जय ॥ गुरुवेनम:
गुरू पूजा विधी विकार,
गुरु अपार गुण विधान
स्वर्गाहून गुरू महान
वंदावे तेची पाय ॥ गुरुवेनम: 
तुही राम है तू रहीम है
तू ही राम है, तू रहीम है
तू करीम, कृष्ण, खुदा हुआ,
तू ही वाहे गुरु, तू येसु मसीह,
हर नाम में, तू समा रहा ।

तेरी जात पात कुरान में,
तेरा दर्श वेद पुराण में ,
गुरु ग्रन्थ जी के बखान में,
तू प्रकाश अपना दिखा रहा ।

अरदास है, कहीं कीर्तन,
कहीं राम धुन, कहीं आव्हन,
विधि भेद का है ये सब रचन,
तेरा भक्त तुझको बुला रहा ।

इस जाति वेश के भेदसे
हमे मुक्त करदो परमपिता
तुझे देख पाये सभी में हम 
तुझे देख पाये सभी जगह ।

 हे प्रभु आनंद दाता
हे प्रभु आनंद दाता, ज्ञान हमको दीजिये
शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिये।

लीजिये हमको शरण में हम सदाचारी बनें
ब्रह्मचारी धर्मरक्षक वीर व्रतधारी बनें।

निंदा किसीकी हम किसीसे भूल कर भी न करें
ईर्ष्या कभी भी हम किसीसे भूल कर भी न करें।

सत्य बोलें झूठ त्यागें मेल आपस में करें
दिव्य जीवन हो हमारा यश तेरा गाया करें।


जाये हमारी आयु हे प्रभु लोक के उपकार में
हाथ ड़ालें हम कभी न भूलकर अपकार में।

मातृभूमि मातृसेवा हो अधिक प्यारी हमें
देश की सेवा करें निज देश हितकारी बनें।


ऐ मालिक तेरे बंदे हम

ऐ मालिक तेरे बंदे हम , ऐसे हो हमारे करम
नेकी पर चलें, और बदी से टलें
ताकि हंसते हुये निकले दम

जब ज़ुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना
वो बुराई करें, हम भलाई करे
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम,
और मिटे बैर का ये भरम, नेकी पर चलें ...

ये अंधेरा घना छा रहा, तेरा इनसान घबरा रहा
हो रहा बेखबर, कुछ न आता नज़र
सुख का सूरज छिपा जा रहा, है तेरी रोशनी में वो दम
जो अमावस को कर दे पूनम, नेकी पर चलें ...

बड़ा कमज़ोर है आदमी, अभी लाखों हैं इसमें कमीं
पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा
तेरी कृपा से धरती थमी, दिया तूने जो हमको जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म, नेकी पर चलें ...

 देवा तुझे किती सुंदर आकाश
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो  ॥धृ॥

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर, पडे त्याचे  ॥१॥
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे, गाणे गाती  ॥२॥
सुंदर वेलींची, सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले, देवा तुझी  ॥३॥
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील ॥४॥
 जय शारदे वागेश्वरी

जय शारदे वागेश्वरी २
विधिकन्यके विद्याधरी, वागेश्वरी वागेश्वरी
जय शारदे वागेश्वरी  ॥धृ॥

ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हस्यातुनी २, चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे २, नीत वर्षु दे अमुच्या शिरी  ॥१॥

विणेवरी फिरता तुझी २, चतुर कलामय अंगुली २
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची मंगली
उन्मेश कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजीरी  ॥२॥

 सत्य शिवाहून सुंदर हे

दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे  ॥धृ॥

इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिक रम्य शुभंकर हे ॥१॥

चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही नाच सागर हे ॥२॥

त्यागाला या माव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे ॥३॥

 शुभंकरोति कल्याणम्

दिवा पाहुनी लक्ष्मीयेते करू तिचीप्रार्थना - २
शुभंकरोति म्हणामुलांनो, शुभंकरोतिम्हणा
शुभंकरोति कल्याणम्,शुभंकरोति कल्याणम्॥धृ॥

जेथे ज्योती तेथेलक्ष्मीउभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन यालक्ष्मीच्या दिसतीपाउलखुणा॥१॥

या ज्योतीने सरे आपदाआरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाशहोता सौख्य मिळे जीवना॥२॥

दिव्या दिव्या रेदीपत्कारकानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कारहा रिवाज आहे जुना॥३॥

सरस्वती स्तवन – हे सरस्वती
हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली
तव ठाई वृत्ती रमली  ॥धृ॥

विश्वाची चालक शक्ती
असशी तू प्रेमळ मुर्ती
देवादिक तुजला नमिती
गुण गाता रसना थकली ॥१॥

चौसष्ट कला विद्येला
शास्त्र गुणी गुंफुनी माला
गणराज अर्पितो तुजला
तव ठाई वृत्ती रमली  ॥२॥

विद्येचा छंदही ज्याला
जो नमिल देवी तुजला
तव कृपा कटाक्षही पडला
तत्कंठी विद्या ठसली ॥३॥

 ब्रम्हनंदिनी वंदन करितो

ब्रम्हनंदिनी वंदन करितो मतिमंद
आनंदाचा कंदच लागो तव छंद 

गंगा यमुना संगम जगी सुखदुखःचा
प्रवाह वाहे खालुनी तव मांगल्याचा

प्रयाग तिर्थाहुनी पावन मन होय
ग्रंथमिषे प्रगटतसे गृही गृही तव तोय

ब्रम्हनंदिनी बुडवी मंजुळ झंकार
कोदंडाचे निमिषी थांबती टंकार

प्राणावाचूनी काया चन्द्राविण रजनी
तुजविण जीवित तैसे प्रसन्न हो जननी

अज्ञानाच्या ग्रीष्मे झाली बघलाही
सोडूनी कैलासा या दावा धावे लवलाही  

 हंस वाहिनी सरस्वतीचा

हंस वाहिनी सरस्वतीचा पदकमली रमते
माझे मन पावन होते   ॥धृ॥

वीणा हाती मंजुळ वादन
श्वेत कमल हे मंगल आसन
राजहंस तव राजस वाहन
घे वंदन माते          ॥१॥

मुर्ती साजरी नयन मनोहर
धवल वस्त्र किती शोभे सुंदर
चंद्रही लाजे उदार अंबर
भारावून जाते      ॥२॥




No comments:

Post a Comment